Veleche Mahatwa Marathi, वेळेचे महत्त्व मराठी, मराठी लेख संग्रह - वेळ, वेळेचे महत्त्व सांगणारा मराठी लेख,

Veleche Mahatwa Marathi | मराठी लेख संग्रह – वेळ | वेळेचे महत्त्व मराठी

Share with

मराठी लेख संग्रह – वेळ | खरचं वेळेला ओळखणे गरजेचे आहे | Veleche Mahatwa Marathi

Veleche Mahatwa Marathi, वेळेचे महत्त्व मराठी, मराठी लेख संग्रह - वेळ, वेळेचे महत्त्व सांगणारा मराठी लेख, वेळ - खरचं वेळेला ओळखणे गरजेचे आहे,
मराठी लेख संग्रह – वेळ

वेळेची किंमत | वेळेचे महत्त्व

तेजोमय आकाश त्यामध्ये भास्कर राजाची अविस्मरणीय साथ.,

वृक्षदेवतेची कलाकुसर भर, त्यावर पक्ष्यांची किलबिलाट.. असे वाटतय की आपणही त्यांचाशी बोलावे.,

मंद झोकात वाहून जाणारे धुके आणि किरणांचा होणारा पडसाद या गोष्टीची साक्ष देतोय की, आपण आपल्या ध्येयाशी कटिबंधीत असलो तर आपण सहजगत्या येणाऱ्या अडचणींना दूर हटवू शकू.,

मनाची होणारी निरनिराळी हलचल त्याचे होणारे आगळेवेगळे रूप. कधी राग तर कधी आनंद, कधी दुःख तर कधी प्रेम किती निसर्गाशी एकरूप असते ना.. निसर्ग जसा आपल्या स्वतःला बदलतो म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा.

योग्य वेळेचे महत्त्व

आणि एका दिवसाचा विचार केला तर, सकाळी आल्हाद ऊन त्याबरोबर थंडीची मोहक साथ, दुपारी ऊन त्यामध्ये शरिराला चटके देणारे कडक ऊन, संध्याकाळी मंद प्रकाशात आपल्याला निसर्गाशी झोकून देणारी सूर्यदेवता, त्यावेळी पडलेले साजेशे रमणीय उन आणि रात्री आपले अस्तित्व काही कालावधीसाठी हरपलेले ऊन या गोष्टीची साक्ष देतात की, आपण ही वेळेनुसार बदलावे लागते. उगीच नाही त्या गोष्टीसाठी त्रास करून घेण्यापेक्षा निसर्गाशी एकरूप होऊन जगावे लागते.

हाती एक किरण पडावा, त्यामध्ये मोहक असा प्रकाश असावा.

ध्येयसिद्धीचा उत्कर्ष असा मंत्र असावा आणि तो किरण शरिरामध्ये सामावून घेतला जाईल अशी प्रकट इच्छा असावी. असा प्रकट ध्यास असावा.

वेळेला ओळखणे

दिवस कसे जात असतात हे कळतच नाही. आज वाटते हे करावे.. ते करावे..! पण आपणाला कळतही नाही की तो निश्चय केलेला दिवस किती दुर लोटला गेला….

खरच जीवन किती गतीशिल आहे ना.. त्यामुळे आपल्याला पण गती घेण्याची गरज आहे. पण ती गती घेत असताना आपल्याजवळ एखादी आपली स्वतःची गोष्ट असेल ना, तर त्या गतीला वेगळी कलाटणी भेटते आणि आपण त्यामध्ये मोठी गती प्राप्त करू शकतो. म्हणून स्वतःला ओळखणे खूप गरजेचे आहे आपल्यामध्ये काय चांगली गोष्ट लपली आहे तीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. खरचं वेळेला ओळखणे गरजेचे आहे..

वेळ : एक अमर्याद शक्ति | वेळेचे महत्त्व मराठी

Veleche Mahatwa Marathi, वेळेचे महत्त्व मराठी, मराठी लेख संग्रह - वेळ, वेळेचे महत्त्व सांगणारा मराठी लेख, वेळ एक अमर्याद शक्ति,
वेळेचे महत्त्व मराठी

वेळेची ताकद

वेळेला काहि मोल नाही, वेळेला काहि तोड नाही. वेळ ही अमर्याद शक्ति आहे, जीला कोणाचीही भिती नाही. वेळ ही अशी गोष्ट आहे जिला कधीही अंत नाहि वेळेला वेळेचीच मर्यादा आहे बाकि कोणाचीही हद्द नाहि. वेळेबद्दल मी कायम विचार करत असतो.

खरच ज्या कोणी व्यक्तीने याचा शोध लावला ती खरच किती महान, कर्तव्यशील असेल या विचाराने मी भारावून जातो. वेळेला अंत नाही. ती अशीच पुढे पुढे सरकत असते आणि आपली नजर चुकवून पळत असते. तिचे सौंदर्य अपार आहे, पण तिची क्रूरता ही तितकीच विघ्न आहे. तिच्यावर प्रेम केले तर ती ही आपणाला भरभरून प्रेम देते, पण तीला दुर्लक्ष केले तर ती ही आपणास दुर्लक्ष करते. किती विछिन्न आहे ना. कडू आहे पण सत्य आहे. वेळ ही वेळ असते.

वेळ माणसाला काय शिकवते

तिला कोणी लहान तर कोणी मोठे नसते, तीला सर्वजण समान असतात. जो कोणी तीला महत्त्व देतो तो महान बनतो आणि जो कोणी तीची कदर करत नाही तो वाया जातो. वेळेची किमया महान अपरंपार आहे. तीची कोणी बोली लावू शकत नाही, ना कोणी तिला विकत घेऊ शकते. ती फक्त तिचीच आहे, ना कोणा एकट्याची. तीचे हात नेहमी खुले असतात लोकांची मदत करायला पण ते काहि कालावधी साठी मर्यादित असतात आणि नंतर बंद होतात. योग्य वेळी तीचे हात धरने सर्वस्वी आपल्या हाती असते. मला एक समजत नाहि की, हिला मी काबीज कसे करू शकेन पण याची सविस्तरता अशी होते की., ती कोणाचीही नाही, मग तिला काबीज कसे करता येईल.

वेळ बदलण्याची ताकद

पण एक मात्र आहे तीला ओळखणे शक्य आहे, तीला पारखणे शक्य आहे. तिला पारखून योग्य वेळी तिच्यावर हस्तक्षेप करणे सहज साध्य आहे. वेळेला पाण्याची उपमा देता येईल, पाणी जसे एका जागी स्थिर राहत नाही तसेच वेळेचे देखिल आहे. नदीचे पाणी जसे कायम वाहत असते तशीच वेळ कायम वाहत असते. तिला कोणतीही मर्यादा नाहि, ना कोणाची पाबंदी.

आपणाला हे शक्य आहे की, आपण स्वतः एक होडी करून त्या नदीच्या प्रवाहातून पाण्यासोबत पुढे जाणे आणि जात राहणे. आणि आपली जिथे मंजील असेल तिथे मुक्काम पक्का करणे. किती क्षणिक आहे ना सगळे.. खरंच वेळ अशीच पुढे सरकत राहणार आपणही असेच मोठे होत राहणार आणि एक दिवस आपण वेळेचा निरोप घेऊन मातीशी एकरुप होणार आणि वेळ पुढे सरकणार. पण आपण तिची साथ सोडली म्हणून ती काहि यांबणार नाही. ती आपला प्रवास असाच चालू ठेवणार नव्या चेहऱ्यांसोबत, नव्या चैतन्यस्वरूप निसर्गासोबत. कारण ती अमर्याद, अमर आहे आणि त्याचबरोबर तिला कोणाचीही पाबंदी नाहीये.

वेळ: तूच ठरव तुला काय करावयाचे आहे | वेळेचे महत्त्व मराठी

Veleche Mahatwa Marathi, वेळेचे महत्त्व मराठी, मराठी लेख संग्रह - वेळ, वेळेचे महत्त्व सांगणारा मराठी लेख, तूच ठरव तुला काय करावयाचे आहे,
मराठी लेख संग्रह – वेळ

वेळेची किंमत काय आहे

तुम्ही वेळेचे ऐकलात तर वेळ तुमचे ऐकेल

क्षणोक्षणीला हवेशी वाटणारी, पाहिजे असूनदेखील निघूण जाणारी, कितिही थांबविले तरि न ऐकणारी, आपलेच खरं अस म्हणणारी, कितीही वाईट अथवा चांगले घडले तरी न थांबणारी, काहीही झाले तरी पुढे सरकरणारी, कधी चांगल्या तर कधी वाईट प्रसंगाना सामोरे जाणारी, कीतिही यातना झाल्या तरि झेलत पुढे सरकरणारी, विविध बदलांना सहन करून पुढे सरसावणारी, माणसांच्या निरनिराळ्या स्वभावांना साक्ष देणारी, मानव जिला विनाकारण दोषी ठरवतो तरी देखील त्याला सहन करणारी, जी कोणती शक्ती असेल तिला आपण ” वेळ” असे संबोधतो.

आपण सहजच असे बोलून जातो की माझी वेळच बरोबर नाहि, माझे Timing चुकले आणि त्याच्यावर सगळे सोपवून मोकळे होतो.

मी एक विचार करतो आपण कायम असेच बोलत राहिलो तर आपण काय मिळविले.

वेळेचा योग्य उपयोग कसा करावा : वेळेचा सदुपयोग

मी गेले कित्येक दिवस नाहि, महिने असे ठरवित आहे की मी “Rich Dad Poor Dad (रिच डॅड पुअर डॅड)” हे पुस्तक पूर्ण वाचेन, पण २-३ वेळा अशा गेल्या की मी पहिले दोन दिवस वाचले आणि नंतर राहून गेले. अगदी अशाच प्रकारे आपण जीवनातील कित्येक प्रसंग, कित्येक कामे अशीच वेळेच्या भरवश्यावर सोडून देत असतो. आणि नंतर आपण वेळेला दोषी ठरवत असतो. पण खरे दोषी आपण स्वतः असतो. वेळ तीचे कार्य करत असते पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून ते म्हणतात ना की, जर तुम्ही वेळेचे ऐकलात तर वेळ तुमचे ऐकेल. अगदी अशाच प्रकारे वेळ आपले कार्य पार पाडत असते. आपण फक्त वेळेची किंमत ठेवणे गरजेचे असते.

वेळेला ओळखणे का गरजेचे आहे : वेळेचे महत्त्व

आपले आयुष्य असेच वेळेनुरुप निघून जात असते. आपण वेळेचे ऐकत नसू तर वेळ पण आपले ऐकत नाही आणि नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त कोणताच मार्ग मागे उरत नाही. त्यामुळे आपण वेळेला महत्त्व दिले तर वेळ ही आपल्याला निच्छित महत्त्व देईल. म्हणून तर हिंदीमध्ये म्हणतात की, आप समय की सूनो समय आप की सुनेगा. त्यामुळे आपण वेळेला किती महत्त्व द्यायचे हे सर्वस्वी आपल्या हाती असते. आणि ते आपले भविष्यातील महत्त्व ठरवत असते..

वेळेचे महत्त्व सांगणारा मराठी लेख

अरे आता होती ना कुठे गेली. अरे मी आताच हिला मुठीत पकडून ठेवली होती कुठे गेली पळून. मी कितीवेळा प्रयत्न केला हिला बंधनात अडकवण्याचा पण ही माझे काहीएक ऐकत नाही.

अगं वेडे थांब जरा कुणासाठी धावतेस इतके; तर मला म्हणते तुला जर माझी कदर असेल तर तूपण माझ्यासोबत धाव, नाहितर मी अशीच पुढे जात राहिन आणि तू माझ्याकडे पाहत राहशिल. अरे कशासाठी तू इतका गुरफटत राहिला आहेस, मी संधी सर्वांना एकवेळच देते तू तिचे काय करावयाचे हे फक्त तुझ्याच हाती आहे.

तूच ठरव तुला काय करावयाचे आहे : वेळेचे महत्त्व

मी कोणाचीही नाही. मला कुणाचीही पर्वा नाहि. मी अशीच धावत राहणार कोणी माझ्यासोबत असूदे अथवा नसूदे मला काहिच फरक पडत नाही.

मी अशीच कालक्रमणा करत राहणार. तुला जर काहि मिळवायचे असेल तर तुला माझी कदर ही करावीच लागणार आहे.

जो माझा विचार करतो, माझी कदर करतो त्याला मी कधीच वाऱ्यावर सोडत नाही आणि जो माझ्याकडे दुर्लक्ष करतो त्याचा मी विचारच करत नाही. त्यामुळे तूच ठरव तुला काय करावयाचे आहे.


प्रत्येक व्यक्तीने वाचावा असा सुंदर मराठी लेख 👇👇

तिच्या मनातील तळमळ : उंच भरारी


प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे सुंदर पुस्तक 👇👇

तिच्या मनातील तळमळ : भाग १


 

 


Share with

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *