मन: मनात उठणारे निरनिराळे तरंग | मनातील भावना मराठी लेख | Manatil Bhavna Marathi Lekh

मन म्हणजे काय?
मन ही अशी गोष्ट आहे की, ती कधीच एका ठिकाणी स्थिर नसते. कधी इथे तर कधी कुठे कोणीच सांगू शकणार नाही. खरच मनाला शाबूत ठेवने इतके पण सोपे नाही.
मनातील विचार
मनाचे निरनिराळे होणारे पैलू आपण अनुभवतोच. मनात उठणारे निरनिराळे तरंग किती आश्चर्यजनक असतात ना. किती विभिन्न प्रकारचे असतात. एखादया क्षुल्लक गोष्टीसाठी मनावर होणारे प्रतिघात किती निरर्थक अस्तात.
मनातील भावना
अरे मना थांब जरा, माझ्याशी बोल थोडे किती धावशील.. तुला थकवा कसा काय जाणवत नाही.. तुला किती घाई असते प्रत्येक गोष्टीची.. किती रे अचल तू., किती अबोल तू., जरा बघ निसर्गाकडे शिक त्यातून काहीतरी, तुझ्या अचाट, निरर्थक कचाट्यातून तू मोकळा हो. बघ जरा अवतीभोवती निसर्ग काहितरी सांगत आहे तुला. तुला वेगवेगळी शिकवण देत आहे.
हे मना बघ जरा शिक काहितरी, बदल स्वतःला, मोकळा हो तुझ्या नकारात्मक विचारातून. जगाकडे चांगल्या दृष्टीने बघ. सकारात्मक दृष्टीकोन बाळग सदा. आताच्या घडीला काय पाहिजे न तू काय करतोयस हे जाणून घे. स्वतःला पारख तू. स्वतःला दिलासा दे. किती ठोकर खाशील.
आता स्वतःमध्ये बदल घडव . Possitive thinking कर. आणि जगाकडे, निसर्गाकडे एका सकारात्मक दृष्टीकोनातून बघ.
मन आणि जीवन
आपण ज्या समाजात वावरतो, ज्या विचारात वावरतो त्यापलीकडे पण एक जग आहे. ते म्हणजे निसर्गाचे. निसर्गाकडून किती गोष्टी आहेत शिकण्याजोग्या . किती निर्लोभ, प्रामाणिक हा निसर्ग आहे.
असे कोणतेच किंवा अशी कोणतीही गोष्ट नाही जीचा संबंध निसर्गाशी नाही. संसारातील सर्व काही निसर्गाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कटिबंधित आहे. त्यामुळे यातून शिकण्याजोगे भरपूर काही आहे, फक्त ते आपण ओळखले पाहिजे.
अस्तित्व : मनात उठणाऱ्या भावना | मनातील भावना मराठी लेख

मनात उठणारे तरंग
काल मी बसमधून येत होतो कानात हेडफोन घालून Songs ऐकत, खूप मजेत, उत्साहात Full Energy, Full Power, Full Confidence तेव्हा अचानक मी कानातून Headphone काढला; बस सुरू होतीच तेव्हा. मला त्यावेळी Feel झाल की, मी कुठे आहे? माझे आस्तित्व काय आहे? ते लागलेले गाणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मनाच्या निरनिराळ्या कलाटण्या किती क्षणभृंगर होत्या., किती Romance देणाऱ्या., किती Energy देणाऱ्या होत्या. त्यावेळी असे वाटत होते की, मी.. मी राहिलो नाहिच. माझ्यात कोणतीतरी Energy आली आहे. मला सर्व काहि शक्य आहे, मी काहिही करू शकतो, मी कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो पण तसे नाहि.
मनातील विचार आणि भावना
तो Headphones जेव्हा कानातून निघाला तेव्हा वास्तवाचे भान झाले. काय आहे दुनिया आणि मी कुठे स्थिरावलो आहे याचे अस्तित्व मला कळून चुकले. त्या मनात उठणाऱ्या माझ्या भावना मला कळून चुकल्या. माझे हरपलेले भान स्थानावर आले., माझा हरपलेला विश्वास पूर्ववत आला., मी अर्थात सर्व गोष्टीना जाणलो, ओळखलो आणि माझ्या कर्तृत्त्वाला समजलो.
अगदि याचप्रमाणे आपले जीवन आहे. आपण कोणत्यातरी अमिषाला अशाप्रकारे बळी पडतो की, आपण स्वतःचे अस्तित्त्व हरवून बसतो. आपण स्वतःला न ओळखता कोणाच्यातरी अधिन जातो व सर्वस्व हरवून बसतो. त्यामुळे आपण अस्तित्वाला जाणले पाहिजे, ओळखले पाहिजे.
अस्तित्व आणि मन यांचा संबंध
काय अस्तित्व आहे आणि आपण काय करतोय याची कुठेतरी सांगड घालावयास हवी. मनात उठणाऱ्या भावनांना आवळले पाहिजे, मनाला समजले पाहिजे. मनात उठणाऱ्या निरनिराळ्या तरंगांना ओळखले पाहिजे व त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. खरच आपण काय करू शकतो हे अनुभवातून शिकले पाहिजे, क्षणभृंगर येणाऱ्या भावनांतून नव्हे.
आपले अस्तित्व आपणच निर्माण करावयास हवे. आपले प्रतिबिंब आपणच असतो. ते आपणच निर्माण करावयास हवे, व वास्तवासी निगडित असे सर्वकाही केले पाहिजे. खूप काही करण्याजोगे आहे पण आपण योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. स्वतःला ओळखणे, स्वतःला जाणणे, स्वतः ला पडताळणे, स्वतःला दिलासा देणे, स्वतःची कुवत ओळखणे, स्वतःला शक्तिशाली बनवणे, स्वतःला सिद्ध करणे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे तितकेचे महत्त्वाचे आहे.
प्रेम : काय आहे प्रेम | मनातील भावना मराठी लेख

प्रेम आणि भावना
एखादी सुंदर मुलगी स्टँडवर उभी आहे समजा आणि तुम्ही तीच्याकडे पाहत आहात आणि थोड्या वेळाने तुम्हाला उमगले की, तीपण तुमच्याकडे पाहत आहे. मग मनामध्ये विविध तरंग उमटतात. मनाची होणारी धावपळ, विछिन्न करणारी, विविध काल्पनिक गोष्टींना धाव घेणारी मनाची होणारी तयारी किती आश्चर्यजनक असते ना.
त्यातून मित्रांचा मिळणारा अमर्याद प्रतिसाद, जणूकाही मला ती मिळालीच आहे असा भास किंवा दिलासा देणारी मित्रांची समजूत. व यातून मिळणारी मित्रांची साथ व त्यामधून साध्य होणारा आत्मविश्वास खूपकाही सांगून जातो. व त्यातून हे साध्य होते की, मुलगी मिळो अगर ना मिळो मैत्री खूप गुढ़ धरते व एकमेकांप्रती विश्वास, जवळीकता खूप वाढते. पण प्रेम कितवर साध्य होते हे ज्याचे त्यालाच ठाऊक. हे क्षणभृंगर क्षण किती विछिन्न करणारे असतात.
प्रेम आणि मन
कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की, ती उभी असणारी मुलगी आपणाला ओळखत देखिल नसते पण उगीचच मनाची होणारी चढाओढ प्रत्यय धरते. मन त्यामध्ये गुरफटते. विविध तरंग उमठवते. मग विविध काल्पनिक गोष्टींना वाचा फुटते, आणि वेळेला पुढे सरसावण्याला काहितरी कारण सापडते. मग मन विविध गोष्टींना त्यामध्ये प्रजल्वित करते. आणि काहितरी सुचवत राहते. मग जर वेळ चांगली असेल किंवा ते म्हणतात ना की, वेळ आपली असेल तर तिच्याशी संवाद साधला जातो.
विविध गोष्टीबद्दल चर्चा होते. त्यामध्ये कित्येक गोष्टी वास्तविक नाहित याचा विचार न करता मांडल्या जातात. विविध प्रसंग मांडले जातात आणि तिचा स्टॉप आला की, ती उतरते आणि निघून जाते आणि आपण काही वेळेसाठी त्यामध्ये विलिन होतो आणि आपल्या मार्गाला लागतो किती रोचक क्षण होत असतात ना त्याप्रसंगी.
प्रेमाचा अर्थ काय आहे
पण यामध्ये एक गोष्ट प्रत्ययास येते की, अशा क्षणांचा आपल्या जीवनात काहिच अर्थ नसतो. ती वेळ क्षणभृंगर असते. ती काही ठराविक, काहि थोड्या वेळेइतकीच मर्यादित असते. त्यातून आपल्याला काही महत्त्वाचे असे साध्य होत नाहि फक्त त्या क्षणापुरतेच मानसिक समाधान प्राप्त होते. ती व्यक्ती पुन्हा कधी आयुष्यात भेटलीच तर त्या प्रसंगांना अवधान फुटते नाहितर त्या गोष्टी मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात दफून जातात.
किती गोष्टी शिकवून जातात ना क्षण. प्रेम हे असेच असते काहि अवधीसाठी हवेहवेसे वाटते नंतर कायमचे बनते. प्रेमाला खूपकाही मार्ग आहेत ते कसे आत्मसात करायचे ते आपल्या हाती असते. आणि या विषयावर खूप थोर व्यक्तींनी खूपकाही लिहून ठेवले आहे. त्यामुळे इथे त्यांचा विषय मांडणे काहि महत्त्वाचे नाही असे मी समजतो. पण शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो प्रेमाला कोणतीही वाचा नसते वा कोणतीही बाधा नसते. प्रेम म्हणजे एक विरंगुळा असतो आणि आपण त्याला कितपत साध्य करू हे आपल्या हाती असते.
इतर साहित्य :
प्रत्येक व्यक्तीने वाचावा असा सुंदर मराठी लेख 👇👇
तिच्या मनातील तळमळ : उंच भरारी
प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे सुंदर पुस्तक 👇👇



