Paristhiti Marathi Lekh, परिस्थिती मराठी लेख, कारण ती एक स्त्री होती, गॉगल खपवल्याचे समाधान, मराठी लेख संग्रह परिस्थिति,

Paristhiti Marathi Lekh | मराठी लेख संग्रह : परिस्थिति | परिस्थिती मराठी लेख

Share with

परिस्थिती मराठी लेख : कारण ती एक स्त्री होती | मराठी लेख संग्रह : परिस्थिति | Paristhiti Marathi Lekh

Paristhiti Marathi Lekh, परिस्थिती मराठी लेख, कारण ती एक स्त्री होती, मराठी लेख संग्रह परिस्थिति,
परिस्थिती मराठी लेख – कारण ती एक स्त्री होती

साधारण रात्रीचे ७-७:३० वाजले असतील. तो त्याच्या बाइक ने काही कामानिमित्त परगावी निघाला होता. दिवस थंडीचे असलेमुळे त्याने जॅकेट आणि कानटोपी घातली होती. तो त्या रस्त्याने पहिल्या वेळीच प्रवास करत होता. अनोळखी रस्ता, अनोळखी लोक असलेमुळे तो जरा जपूनच आपली बाइक चालवत होता. शहर सोडल्यानंतर रोड ने थोडे पुढे जात असता त्याला रस्त्याच्या डाव्या साइड ला एक स्त्री उभी असलेली दिसली.

स्त्री आणि परिस्थिती मराठी लेख

साधारणतः २९ ते ३० वय असणारी ती स्त्री त्याच्याकडे पाहत असलेचे त्याला जाणवले. शरीराची नाजुक बांधणी, हातामध्ये पर्स, डोक्याला स्कार्फ आणि गुलाबी कलर ची साडी नेसलेली ती स्त्री त्याच्याकडे पाहत होती पण त्याला ती हात करत नव्हती म्हणजेच लिफ्ट मागत नव्हती. तिच्या डोळ्यातून तिची गाडी थांबवण्यासाठी होणारी तळमळ स्पष्ट दिसत होती. कदाचित अनोळखी व्यक्तीशी असे वर्तन करणे तिला अवघड जात असावे.

स्त्रीचे जीवन आणि परिस्थिती

त्याला असे वाटत होते की, कदाचित ती स्त्री कुठेतरी नोकरीला असावी. आणि घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी असावी, पण तिची बस तिला त्यावेळी चुकली असावी. तिला माझ्यामध्ये काहीतरी असे जाणवले असावे की, ज्यामुळे ती मला थांबवण्याचा विचार करत असावी. कदाचित घरी तिची लहान मुले वाट पाहत असावीत, कदाचित घरी जाण्यासाठी तिला खूप वेळ झाला असावा. पण ती त्यावेळी मनात असून देखील मला थांबवू शकत नव्हती, कारण ती एक स्त्री होती.

स्त्रीच्या संघर्षाची कहाणी

परिस्थिति नेहमी अशा वेळी स्त्री च्या विरोधात उभी असते. कारण समोरचा व्यक्ति कोणत्या उद्देशाने आपल्या कडे पाहत असेल? याचा एक स्त्री अशा वेळी अंदाज लावू शकत नाही. कारण रात्रीच्या वेळी अशा अनपेक्षित प्रसंगी ती कुणावर निसंकोच पणे विश्वास कधीच ठेऊ शकत नाही. परिस्थिति ने ओढवलेल्या भयानक संकटापुढे अशा अनेक स्त्रियांना घरासाठी हातभार लावावा लागतो. चार पैसे मिळवून आपला संसार सुरळीत पणे चालावा, आपल्या मुलांना काही कमी पडू नये यासाठी स्त्री धडपडत असते. आणि त्यासाठी ती पडेल ते काम करण्यासाठी राजी झालेली असते.

स्त्रीची प्रेरणा : तिची प्रचंड इच्छाशक्ती

तिची प्रचंड इच्छाशक्ती तिला काम करण्यासाठी प्रेरणा देत असते आणि तिला अशा कामासाठी धाडस देत असते. पण समाजाच्या भीतीने तिला जपून आपली पावले टाकावी लागत असतात. तिला आपली मर्यादा सोडून काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि त्यातूनच ती आपले आयुष्य जगत असते. आणि कदाचित अशा खूप साऱ्या प्रश्नांच्या दबावाखाली ती स्त्री मनात असून देखील त्याला थांबवण्याचे धाडस त्यावेळी करू शकत नव्हती, कारण ती एक स्त्री होती.. कारण ती एक स्त्री होती..

परिस्थिती मराठी लेख : गॉगल खपवल्याचे समाधान | मराठी लेख संग्रह : परिस्थिति | Paristhiti Marathi Lekh

Paristhiti Marathi Lekh, परिस्थिती मराठी लेख, गॉगल खपवल्याचे समाधान, मराठी लेख संग्रह परिस्थिति,
परिस्थिती मराठी लेख – गॉगल खपवल्याचे समाधान

आज असाच बाइक वरुण प्रवास करत होतो तेव्हा माझ्याकडे व्हाइट गॉगल होता जो मला सकाळी तसेच रात्री वापरता येत होता. पण मला डे साठी ब्लॅक स्क्रीन वाला गॉगल हवा होता त्यासाठी मी त्याचा शोध घेत होतो. मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉन्ग करत असलेमुळे पैशांचे बजेट पण कमी म्हणून रस्त्याच्या साइड ला जी गॉगल विकणारी असतात ना त्यांच्याकडे मी गॉगल घेण्यासाठी गेलो.

गॉगल विक्रीचा अनुभव

तेव्हा तिथे एका युवकाने स्टॉल मांडला होता. साधारण ३० ते ३२ वय असणारा तो तरुण रंगाने गोरा, तब्येतीने ठीकठाक होता. त्याचे डोळे थोडे लहान होते आणि त्याला बहुतेक चष्मा लागला होता. बोलणे अगदी मवाळ ज्यातून परिस्थितीची जाणीव आणि कामाबद्दलची तळमळ सहज जाणवत होती.

मी त्याला विचारले की गॉगल ची किंमत काय? तेव्हा त्याने मला काही गॉगल दाखवले. त्यातून मला काही पसंद पडले पण मला गॉगल दीखाव्यासाठी न वापरता डोळ्यांच्या संरक्षणासाठी वापरायचे असतात त्यामुळे मी त्याला डोळ्यांना फिट बसेल असा गॉगल दाखवण्याची विनंती केली. तेव्हा त्याने मला दोन गॉगल दाखवले त्यातील एक मी पसंद केला तो पण त्याच्या विनंती खातर. कारण मला ग्लास चा गॉगल हवा होता पण तो फायबर मध्ये येत होता.

बरं असो झालेतर, मी तो गॉगल पसंद केला आणि त्याला त्याची प्राइस विचारली तेव्हा त्याने मला सांगितले की १३० रुपये, तुम्हाला म्हणून १०० रुपयाला देतो. तेव्हा मी थोडा विचार केला की, जर का मला १०० रुपयांमद्धे ग्लास चा गॉगल मिळत असेल तर हा गॉगल घेण्यात काय अर्थ नाही. तेव्हा मी त्याला गॉगल नको म्हणालो.

परिस्थिती आणि जीवन

तेव्हा त्याने मला विचारले की, तुम्ही सांगा कितीला घेणार? तेव्हा मी त्याला बोललो की ७० रुपये देतो. कारण माझ्याकडे पण पैसे नव्हते आणि गॉगल ही माझ्याकडे available होता पण तो व्हाइट होता. तेव्हा मी असच माझी बाजू मांडली. तेव्हा तो युवक बोलला की इतके कमी होणार नाही, मला पण परवडायला पाहिजे की! तेव्हा मी बोललो ठीक आहे., मला तशी गॉगल ची आवश्यकता नव्हतीच फक्त तुम्ही बोलला म्हणून घेण्याचा विचार करत होतो. आणि मी तिथून निघण्यासाठी गाडीची किक मारली आणि थोडे पुढे गेलो तेव्हा त्याने मला बोलवले तेव्हा मी तिथेच थांबलो.

तो म्हणाला ९० तरी द्या तेव्हा मी म्हणालो मला ७० लाच परवडते त्यामुळे मी काय ९० रुपये देऊ शकणार नाही. तेव्हा तो म्हणाला बर १० रुपये तरी जास्त द्या अस म्हणत तो माझ्या दिशेने गॉगल घेऊन आला. तेव्हा मी माझ्या वॉलेट मधून ७० रुपये काढले आणि त्याला दिले. तेव्हा तो म्हणाला ७० रुपयेच दिला शेवटी; तेव्हा मी १० रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवली आणि म्हणालो परत येतो गॉगल घ्यायला.

संघर्षातून मिळालेले समाधान

तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पैसे मिळाल्याचे समाधान दिसत होते. मला माहीत नाही की त्याला किती फायदा झाला असेल पण त्याला गॉगल खपवल्याचे समाधान नक्कीच वाटत होते. त्याच्या कृतीतून त्याला भिडत असलेल्या पैशाच्या समस्येची जाणीव मला जाणवत होती, परिस्थिति ने मांडून ठेवलेली दयनीय अवस्था न सांगता स्पष्ट दिसून येत होती. खरच माणसाची परिस्थिति त्याला जगायला शिकवत असते. आणि तीच परिस्थिति त्याला जीवन जगण्यासाठी आणि आपले पोट भरण्यासाठी वेगवेगळे धंदे करायला भाग पाडत असते. जसे की या तरुणाला भाग पाडले..



प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे सुंदर पुस्तक 👇👇

तिच्या मनातील तळमळ : भाग १

Tichya Manatil Talmal, 
तिच्या मनातील तळमळ भाग १,
तिच्या मनातील तळमळ,
E Book Tichya Manatil Talmal,

प्रत्येक व्यक्तीने वाचावा असा सुंदर मराठी लेख 👇👇

तिच्या मनातील तळमळ : उंच भरारी


 

 

 

 


Share with

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *