मराठी लेख संग्रह, सुंदर मराठी लेख, प्रेरणादायी मराठी लेख, मनाला स्पर्श करणारे मराठी लेख, मराठी साहित्य, Marathi Lekh, Marathi Article, Tyachya Manatil Talmal, Jivnacha Shodh,

Tyachya Manatil Talmal – Jivnacha Shodh | त्याच्या मनातील तळमळ – जीवनाचा शोध | Marathi Lekh

Share with

तो आता आपल्या पस्तीसीच्या उंबरठ्यावर पोहचला होता. आपल्या जीवनाच्या ऐन जवानीत केलेल्या कारनाम्यांचे तो आता अवलोकन करत होता. व्यसनाधीनतेच्या अत्युच्य शिखरावर पोहोचल्यामुळे त्याला आता कशाचेच भान राहिले नव्हते, तो आता भेदुंद होऊन इतरत्र फिरत होता.

आपल्या अति व्यसनाच्या सेवणाने त्याला आता कशाचेच भान राहिले नव्हते. आणि त्या मदिरेच्या प्रेमापोटी त्याने आपल्या अर्धांगिनीला आपल्यापासून दूर लोटले होते. आपल्या पत्नी ऐवजी त्याने आपल्या व्यसणाला स्वीकारले होते. आणि आपल्या व्यसणापुढे तो आता हतबल होऊन बसला होता.

मराठी लेख संग्रह, सुंदर मराठी लेख, प्रेरणादायी मराठी लेख, मनाला स्पर्श करणारे मराठी लेख, मराठी साहित्य, Marathi Lekh, Marathi Article, Tyachya Manatil Talmal, Jivnacha Shodh,
Tyachya Manatil Talmal – Jivnacha Shodh

एकदा असेच नदीच्या किनारी फिरत असता त्याला वास्तविकतेचे भान होऊ लागले. पाण्याच्या लाटांबरोबर त्याला आपल्या केलेल्या चुकांचे स्मरण होऊ लागले. आपणही नदीच्या प्रवाहाप्रमाणे किती क्षण असेच दूर लोटत गेलो याचे विस्मरण त्याला होऊ लागले. आपण आपल्या व्यसनाधीनतेमुळे आपल्या सर्वांत प्रिय असणाऱ्या बायकोला कसे दूर लोटले याचा प्रकर्षाने प्रत्यय त्याला आता येऊ लागला.

नदीच्या पलीकडे असणाऱ्या वृक्षांच्या गर्द छायेत त्याला आपल्या भूतकाळाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसू लागले. आपल्या गर्द हिरव्या वृक्षांप्रमाणे असणाऱ्या आयुष्याचे आपण कशाप्रकारे वाळलेल्या वृक्षांसारखी अवस्था करून ठेवली याचे भान आता त्याला कुठेतरी येत होते. आपले जीवन आपण नेमके कुठे व्यतीत केले याचेही भान त्याला आता होत होते.

आपल्या जीवनामध्ये केलेल्या असंख्य चुकांचे प्रतिबिंब त्याला आता नदीच्या पात्रात दिसत होते. जीवन म्हणजे नेमके काय याची प्रचिती त्याला आता येत होती. पण त्याचे कोडे त्याला काहीकेल्या सोडवत नव्हते.

त्याचे मन त्याला आता विचारत होते तू नेमके केलेस तरी काय? व्यसनाच्या आहारी जाण्याव्यतिरिक्त तू जीवनात काय मिळवलेस? याचे उत्तर त्याचे मन त्याच्याकडून मागत होते. व्यसनाची आस त्याला कशी लागली याचा शोध ते आता घेत होते. व्यसनाच्या हव्यासापोटी कित्येक नातीगोती त्याने गमावली याचा प्रत्ययास त्याचे मन त्याला आता देत होते.

कुठे तू हरवलास? याचे उत्तर ते आता त्याच्याकडून मागत होते. गेलेल्या कित्येक वर्षांचा हिशोब ते आता त्याच्याकडून मागत होते. व्यसणापलिकडे ही एक जग आहे याची जाणीव आता त्याला त्याचे मन करून देत होते.

आणि त्या मनाने आता पाण्याचे रूप घेतले होते आणि ते आपल्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे सरकत होते. जीवनात अनुभवण्यास आलेल्या कित्येक क्षणांचे ते त्याला आता दर्शन घडवून देत होते. आपल्या खोलवर जाणाऱ्या नदीच्या पातळी बरोबर ते आता त्याला आपल्या जीवनाची खोली किती खोल आहे याची जाणीव करून देत होते.

आपला मित्रपरिवार, आपले कुटुंब आपले स्नेही आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत याची जाणीव ते आता त्याला करून देत होते. जसे पाण्याला प्रवाहाची गरज असते आणि जर तो प्रवाह तसाच थांबला तर त्या पाण्याला काहीच अर्थ उरत नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण पुढे जाण्यासाठी आपल्या पत्नीची किती गरज असते याची कुठेतरी जाणीव त्याचे मन त्याला आता करून देत होते.

जशी पाण्याची खोली कधीच मापता येत नाही तशीच आपल्या जीवनाची खोली ही नापता येणे अशक्य असते याची प्रचिती त्याला आता ते करून देत होते.

आणि याच मनाच्या होणाऱ्या असंख्य लहरींसमोर त्याच्या मनाची तळमळ अधिकच तीव्र होत चालली होती. त्या तळमळी समोर तो आता नतमस्तक झाला होता. त्याच्या मनाच्या तळमळीने आता होडीचे स्वरूप घेतले होते आणि आपल्या असंख्य प्रश्नांची गुंतागुंत घेऊन ती होडी नदीच्या पात्रात आता इतरत्र भटकत चालली होती.

ती होडी त्याला विचारत होती की, का तू मला पाहिजे त्या ठिकाणी थांबवले नाहीस? का तू तुझ्या निर्दयी पणामुळे माझ्या वल्हया अधिकच ताणल्या? का तू मला असे सैरावैरा फिरू दिलेस? का तू मला प्रवाहाविरुद्ध घेऊन गेलास? का तू माझ्या इच्छा आकांक्षा अशाच पाण्यासोबत वाहू दिल्यास? का तू माझी गती मंद केलीस एका क्षुल्लक व्यसणापाई? का? का? मला उत्तर दे.. का?

त्याच्या मनाची तळमळ आता अधिकच वाढत होती. तिला आता कुणाच्या तरी आधाराची गरज होती पण तो आधार त्याने आपल्या व्यसनाच्या आहारी जाऊन गमावला होता. त्यामुळे त्याची तळमळ आता अधिकच प्रबळ होत चालली होती. ती तळमळ आता आपला रोख परत व्यसनाच्या दिसेने करत होती.

पण त्याच वेळी त्याच्या मनाची दुसरी तळमळ त्याला सावध करत होती, ती सांगत होती की याच व्यसणाने तुझी ही अवस्था केली आणि परत तू त्याच्याकडेच आपली पावले कशी काय रोखू पाहत आहेस..? तर पहिली तळमळ हे सांगत होती की, तुला आता फक्त व्यसनाचाच आधार आहे त्याशिवाय तुझ्याकडे दूसरा कोणता पर्याय आहे..?

आणि या मनाच्या होणाऱ्या दुहेरी तळमळी पुढे त्याला आता काहीच सुचत नव्हते. जी तळमळ त्याला आणखीनच आपल्या दुनियेत खेचत होती. जी तळमळ त्याला आता जीवनाचे खरे अस्तित्व काय आहे याची जाणीव करून देत होती. जी तळमळ त्याला आता एक तर व्यसणापासून परावृत्त करणार होती नाहीतर व्यसनात आणखीनच गुंतवून ठेवणार होती.

जी तळमळ फक्त आता त्याच्या अस्थिर जीवनाचा शोध घेणार होती आणि त्या जीवनाला स्थिरत्व कसे येईल याचा मार्ग शोधणार होती. पण त्याचवेळी एक मार्ग परत व्यसनाकडे जाणारा होता तर दूसरा मार्ग जीवनाचा शोध घेणारा होता जो त्याचे जीवन अधिक सुखमय आणि शांत करणारा होता.. जो मार्ग परत त्याला आपल्या पत्नीला मिळवण्याचा होता.. जो मार्ग त्याचे जीवन समृद्ध करणारा होता.. जो मार्ग त्याच्या जीवनाला नवी दिशा देणारा होता.. जो मार्ग त्याच्या जीवनाचे कोडे सोडवून त्याच्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा होता..  


तिच्या मनातील तळमळ : भाग १

Tichya Manatil Talmal, 
तिच्या मनातील तळमळ भाग १,
तिच्या मनातील तळमळ,
E Book Tichya Manatil Talmal,

तिच्या मनातील तळमळ – उंच भरारी



Share with

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *