परिस्थिती हि माणसाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परिस्थितीनुसार सर्वकाही बदलत असते. जेव्हा आपली परिस्थिती चांगली असते तेव्हा सर्वजण जणूकाही आपले ऋणी आहेत की काय असा भास जाणवत असतो आणि एकदा परिस्थिती पालटली की सर्वजण आपल्याला दुरावतात की काय असा भास मनाला कुठेतरी जाणवतो.
आपल्यावर जेव्हा वाईट परिस्थिती येते, जेव्हा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते तेव्हा आपणाला आपल्या वास्तविक मित्रांची साथ मिळते तीपण थोड्याच पण अभिमानास्पद मित्रांची साथ असते. अशी मैत्री खरच किती साजेशी असते ना. तेव्हा असे वाटते की “जींदगी मे कुछ भी हो मगर मै अपने इन दोस्तों का साथ कभी नहिं छोडूंगा” आपले मित्रमंडळ खूप असते पण त्यामधील निस्वार्थी मित्रांची साथ कमीच असते.
प्रत्येकजण आपल्या स्वार्थाप्रमाणे मैत्रीला आमंत्रण देतो, त्यामध्ये खूप अशी कारणमिमांशा असते ज्याची एका खऱ्या मित्राला कल्पनादेखील नसते. मला नेहमी मित्रांसाठी खूप काही करावेसे वाटते पण निस्वार्थी मित्रांसाठी जे फक्त माझ्यावर प्रेम करतात. माझ्या कठिण परिस्थितीला मला साथ देतात. सर्वांनाच मैत्रीची हाव असते. कोणी मैत्री Business साठी करतो तर कोण Time pass साठी, कोणी मैत्री पैशाच्या हव्यासापोटी करतो तर कोणी स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी. मैत्रीचे खूप काही पैलू आहेत.
पण माझ्या दृष्टीकोणातून मैत्री ही फक्त मैत्री असावी जी सर्व परिस्थितीला साथ देऊ शकेल, आपली परिस्थिती समजून घेऊन त्यावर योग्य तो पर्याय निवडू शकेल. जी निस्वार्थी असेल त्यामध्ये कोणताही मोह नसेल, त्यामध्ये एक गोडवा असेल, त्यामध्ये मैत्रीचे विश्वासावे एक अतूट नाते असेल, जसे पक्षांचे आकाशाशी नाते असते तसेच मैत्रीचे हे अतूट नाते विशाल असावे जे मित्राच्या सर्व परिस्थितीमध्ये साथ देऊ शकेल.
मराठी लेख : परिस्थिती मैत्रीचे अतूट नाते
Marathi Lekh